तुम्ही बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाला येताय ?
मग एक काम नक्की करा. सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच, यावर्षी बी एम एम ने एक वेगळा कार्यक्रमसुद्धा आयोजित केला आहे. ‘AI करेल ना बे’ ह्या कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा!
नक्की काय असणार आहे ह्या कार्यक्रमात?
कृत्रिमप्रज्ञा (Artificial Intelligence) म्हणजे काय? जर यंत्र स्वतः विचार करू लागलं, तर त्याचे फायदे / तोटे काय होतील? समाजावर काय परिणाम होऊ शकतात? या क्षेत्रात नक्की काय संशोधन सुरु आहे? त्याचे दूरगामी परिणाम काय होतील? या सगळ्यावर या क्षेत्रात काम करणारे काही मराठी शास्त्रज्ञ चर्चा करणार आहेत.
तुमच्या मनात याविषयी काही प्रश्न असतील तर त्याला या कार्यक्रमात सहभागी शास्त्रज्ञ उत्तरे देतील. ते प्रश्न तुम्ही कार्यक्रमापूर्वी खालील QR code वापरून कळवू शकता, म्हणजे प्रत्यक्ष कार्यक्रमात आम्ही त्यांची दखल घेऊ. हा कार्यक्रम interactive असणार आहे - आणि विज्ञानासंबंधी आस्था असणाऱ्या प्रत्येकानं त्यात सहभागी व्हावं! हा QR code स्कॅन करा आणि तुमचा प्रश्न आमच्याकडं पाठवा.
(QR code ऐवजी हा दुवाही वापरू शकता: https://tinyurl.com/ai-karel-na-be )
कार्यक्रमाची तारीख: २८ जून २०२४
वेळः दु, ४:३०
स्थळः San Jose Convention Center, CA
(कार्यक्रम मराठी व इंग्रजी दोन्ही भाषामिश्रित असेल.)
No comments:
Post a Comment